सदाभाऊ खोत यांची राज्यपालांशी भेट, केली ही मागणी

Sadabhau Khot-Governer Koshyari

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उदभवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आणि रयत क्रांती मंडळाचं शिष्टमंडळाने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेतली. लॉकडाऊन करणे राज्याच्या हिताचे नाही. लॉकडाऊन करण्याआधी राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार, श्रमिकांच्या खात्यावर १० हजार रक्कम जमा करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आणि मत्स्यशेती करणाऱ्या मच्छिमारांसाठी आधी उपाययोजना कराव्या तसेच महाराष्ट्रातील कामगाराला आर्थिक मदत देऊनच लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button