हे सरकार दारुडे – सदाभाऊ खोत

Sadabhau Khot - CM Uddhav Thackeray

सांगली : कोरोनाच्या(Corona) साथीच्या काळात दारूची दुकाने (Liquor Shops) सुरू केली आणि शिवजयंतीसाठी निर्बंध लावले. ठाकरे सरकार (Thackeray Govt)दारुडे आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांनी केली.

सरकारवर टीका करताना खोत म्हणालेत, कोरोना वाढला आहे असे सरकार आता सांगते आहे. सहा महिने कोरोना कुठे झोपला होता का? सहा महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत का? आता अधिवेशन जवळ आले आहे. विरोधी आमदार जनतेचे प्रश्न मांडणार, त्याला तोंड द्यावे लागणार म्हणून राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करते आहे का?

तू येतोस का चिलीम लावायला? मिटकरींना टोमणा

सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींनाही टोमणा मारला. म्हणालेत, अमोल मिटकरी यांनी आरोप केला होता की मी दारू विकली. मी म्हणतो गांजाही विकत होतो; तू येतोस का चिलीम लावायला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER