शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा; खोत यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Sadabhau Khot - CM Uddhav Thackeray

कऱ्हाड : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा, अशी मदत राज्याच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने प्रत्येक गोष्ट करत आहेत , अशी टीका खोत यांनी केली .

फळलागवड असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार तर कोरडवाहूसाठी २५ हजार रुपये देणे आवश्यक आहे. दिवाळी तोंडावर आलेली असल्याने लवकर मदत देऊन राज्य सरकारने मेहरबानी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान कोरोनाच्या (Corona) काळात शेतकरी हा पूर्णपणे होरपळून निघालेला आहे. या वर्षीची शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होत आहे. सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची विल्हेवाट बघितली तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणी पुरवठा विभाग या सर्वांना निधी विभागून दिला आणि त्यातून शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ पाच हजार कोटी येतील. कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा, अशी मदत राज्याच्या शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER