शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सदाभाऊ खोतांची टीका

sadabhau_khot_sharad_pawar

सातारा :- रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शेतकरी आंदोलनावरुन शरद पवार आणि आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधी क्रिकेट खेळले होते का? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला दुसऱ्या क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावर सदाभाऊ खोत बोलत होते.

सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातल कळत त्यातल त्यांनी बोलाव अस विधान केलं हे ऐकून थोडा वेळ हसू आलं,असं रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले. शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का? सध्या ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी कधी कुस्ती खेळली होती? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : केवळ बातम्या करण्यासाठी शरद पवारांवर टीका, अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER