राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सदाभाऊंनी दिला नवा फॉर्म्युला

Sadabhau Khot

मुंबई :- रयत क्रांती संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतली. राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करताना १२ जणांची नावे त्यांनी सुचवली.  तसे  निवेदन त्यांनी राज्यपालांना दिले. त्यामध्ये विज्ञान, साहित्य, कला, सहकार क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतील  प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर संधी देण्याची परंपरा आहे. राज्यांमध्ये अनेक नामवंत आहेत की ज्यांना आजपर्यंत कुठे संधी मिळालेली  नाही. अशा व्यक्तींचे  गेली अनेक वर्षे  आपापल्या क्षेत्रात काम सुरू आहे. तरी अशाच काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींची  नावे राज्यपाल महोदयांना सदाभाऊ खोत यांनी सादर केली. त्यांनी राज्यपालांना सादर केलेली नावे अशी-

१) मकरंद अनासपुरे (कला फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य )
२) विठ्ठल वाघ (लेखन  व साहित्यिक)
३) विश्वास पाटील (लेखन व साहित्यिक)
४) जहीर खान (क्रीडा)
५) मंगलाताई बनसोडे (कला )
६) अमर हबीब (सामाजिक कार्य व पत्रकार)
७) निवृत्ती महाराज इंदुरीकर (सामाजिक कार्य व प्रबोधन)
८) पोपटराव पवार (सामाजिक कार्य)
९) डॉ. तात्याराव लहाने ( सामाजिक कार्य व आरोग्यसेवा)
१०) डॉ. प्रकाश आमटे (सामाजिक कार्य)
११) सत्यपाल महाराज (सामाजिक कार्य व प्रबोधन)
१२) बुधाजीराव मुळीक (विज्ञान व शेती विषयाचे गाढे अभ्यासक)

या व्यक्तींचा सहानुभूतिपूर्वक विचार करून त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी द्यावी, अशी विनंती खोत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER