सचिनची ताडोबात जंगल सफारी

Sachin's jungle safari in Tadoba

चंद्रपूर : देशभरात पर्यटकांकरिता ताडोबा अभयारण्य वाघांचे हमखास होत असलेल्या दर्शनामुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळेच ताडोबात जंगल सफारीकरीता (वाघाच्या दर्शनकरिता) सेलिब्रेटींची हजेरी लागत आहे. नुकतेच्या चार दिवसाच्या ताडोबा जंगल सफारीसाठी आलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरना (Sachin Tendulkar) पाचही दिवस सफारी दरम्यान वाघ, वाघीणींचे दर्शन झाले. त्यापैकी झरणी, छोटी तारा, झुनाबाईची त्यांना विशेष भुरळ पडली. गुरुवारी त्यांनी परिवारासह या चार दिवसाच्या मुक्कामानंतर ताडोबा ( Tadoba safari) अभयारण्याचा निरोप घेतला.

पहिल्याच दिवशी ताडोबात आगमनानंतर सचिन यांनी, दुपारी अलीझंझा प्रवेशद्वारातून सफारी केली. त्यावेळी झरणी नावाच्या वाघीणीचे बछड्यासहीत दर्शन घडले. शिवाय एक बिबट पाहता आले. दुसर्या दिवशी २५ जानेवारीला मदनापूर प्रवेशद्वारातून सफारी करण्यात आली. त्यावेळी पिल्लासह आणि एका वाघासह असलेल्या झुणाबाईचे दर्शन झाले. २६ जानेवारीला बेलारा प्रवेशद्वाराने सफारी पार पडली. यावेळी एका वाघाने दर्शन दिले. काल २७ जानेवारी आणि आज शेवटच्या दिवशी छोटी तारा नावाच्या वाघीनेचे दोन्ही दिवस दर्शन झाले. एकंदरीत चार दिवसाच्या मुक्कामी झरणी, छोटी तारा, झुनाबाईची भुरळ सचिन आणि त्यांच्या परिवाराला पडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER