सचिन वाझेंची बदली पवारांच्या एका कॉलमुळे?

Sharad Pawar-Sachin Vaze

मुंबई :- मनसुख हिरेन (Masukh Hiren) प्रकरणात अडचणीत सापडलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachine Vaze) यांची काल अखेर क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली. विरोधकांनी या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला बॅकफूटवर यावे लागले. सचिन वाझेंच्या अटकेच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत सभागृह चालू न देण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता.

ही सर्व बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. आणि काही वेळातच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधानपरिषदेत वाझेंच्या बदलीची घोषणा केली. त्यामुळे वाझेंची बदली पवारांच्या एका कोलने झाल्याची चर्चा साध्य रंगू लागली.

यापूर्वीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले होते. त्यावेळीही पवारांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आणि चार दिवसांनी संजय राठोडांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे विशेष.

ही बातमी पण वाचा : पवार ऍक्शन मोडवर : मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट नांगरे पाटलांना बोलावले, अर्धा तास चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER