सचिन वाझेचा लेटरबॉम्ब : पवारांच्या मनधरणीसाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी, मंत्र्यावरही आरोप

Sachin Waze -anil deshmukh-sharad pawar

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेनेही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत एनआयए (NIA) कोठडी ठोठावली आहे. सचिन वाझे (Sachin Waze) याने पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मागितल्याचे आरोप केले आहे. हे कथित पत्र तीन पानांचे आहे. महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.

या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे याने लिहिले आहे. ते पत्र आता एनआयए कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे याच्या पत्रात करण्यात आला. दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणात आता एनआयएबरोबरच सीबीआयकडून प्रत्यक्षरीत्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकंच नाही तर संबंधित पत्रावरून मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझे याने घूमजाव करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

सचिन वाझे याने लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. २०२० मध्ये त्याला पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. पण एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला पुढे ही रक्कम देण्यास सांगितलं.

ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील १ हजार ६५० बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता.

इतकंच नाही तर सचिन वाझे याने आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलावलं होतं. डीसीपींच्या बदल्या होण्याच्या तीन-चार दिवसांआधी परब यांनी बोलावलं होतं. सुरुवातीला SBUTबद्दलच्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं. त्यानंतर विश्वस्तांना घेऊन येण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर चौकशी थांबवण्यासाठी परब यांनी SBUT ५० कोटी रुपये मागितले होते. हे काम करण्यास आपण असमर्थता दर्शवली. कारण आपल्याला SBUTबद्दल माहिती नव्हती. त्याचबरोबर चौकशीवरही आपलं कोणतंही नियंत्रण नव्हतं, असं वाझे याने पत्रात म्हटलं आहे.

जानेवारी २०२१ मध्ये मंत्री अनिल परब यांनी आपल्याला पुन्हा शासकीय बंगल्यावर बोलावलं आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या यादीतील काही ठेकेदारांची चौकशी करण्यास सांगितलं. अशा ५० ठेकेदारांकडून दोन कोटी रुपये वसूल करण्यास त्यांनी सांगितलं होतं. अज्ञात तक्रारींच्या आधारावर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. ठेकेदारांविरोधातील तक्रारींची गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखा अर्थात क्राईम इंटेलिजन्स विभागाने केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही, असं वाझे याचं म्हणणं आहे.केलेल्या तपासातून काहीही निष्पन्न झालं नाही, असं वाझे यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button