सचिन वाझेचे बनावट आधारकार्ड जप्त; पंचतारांकित हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज NIA कडे

मुंबई : मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी (Mansukh Hiren’s death Case) रोज नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणी अटकेतील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सचिन वाझे (Sachin Waze) याचे बनावट आधारकार्ड हाती लागले आहे. या आधारकार्डचा (Fake Aadhaar card) वापर करत वाझे हा ट्रायडेंट हॉटेलमध्ये थांबला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या आधारकार्डवर ‘सुशांत सदाशिव खामकर’ असे नाव दिले आहे. तर एनआयएने ट्रायडेंट हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीची तपासणी करताना सचिन वाझे याचे फुटेज एनआयएच्या हाती लागले आहे. यात वाझेच्या हाती पाच मोठ्या बॅगा दिसत आहेत. त्या बॅगेत पैसे आहेत की आणखी काय? अद्यापही याची माहिती आलेली नाही.

दुसऱ्या सीसीटीव्हीत वाझेसोबत एक महिला आहे. या महिलेच्या हातात नोटा मोजण्याचे मशीन आहे. या महिलेचा वाझे याच्याशी संबंध काय? ती महिला सचिन वाझेला ओळखते का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. सध्या या महिलेचा शोध घेतला जात आहे. वाझे याच्या हातात ज्या पाच बॅग आहेत, यात जिलेटीन असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.

पंचतारांकित हॉटेलात मुक्काम
दिवसेंदिवस वाझेच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझे बनावट आधारकार्ड दाखवून पंचतारांकित हॉटेलात राहात होता. ते बनावट आधारकार्डही जप्त केले. वाझे १६ फेब्रुवारीला हॉटेलात थांबला होता. बनावट आधारकार्ड दाखवून हॉटेलात राहण्याचे कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत.

वाझेची डायरी एनआयएच्या हाती
एनआयएच्या हाती सचिन वाझेची डायरी लागली आहे. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचे आहे, या डायरीत पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कामांचा उल्लेख आहे. डायरीतून हप्त्याची गुपिते उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब वाझे ठेवत होता. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER