अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच – एनआयए

Sachin Waze the man seen on CCTV outside Antilia - NIA

मुंबई :- उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे निवासस्थान ‘अँटिलिया’च्या जवळ जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ आढळली. त्यावेळी तिथल्या सीसीटीव्हीमध्ये पीपीई कीटसारखा, चेहऱ्यासह संपूर्ण शरीर झाकणारा ड्रेस घातलेली एक संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळली. ही व्यक्ती सचिन वाझेच आहे, अशी माहिती एनआयएने (NIA) दिली.

एनआयएने म्हटले आहे की, कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या, हे अजून उघड झाले नाही. मात्र, अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने PPE कीट घातलेली नसून साधा कुर्ता-पायजमा घातला आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयए करत असून मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मुंबई सीआययूचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, अँटिलियाबाहेरचे एक सीसीटीव्ही फुटेज एनआयएने तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावरदेखील व्हायरल होऊ लागले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती PPE कीट घालून अँटिलियाच्या बाहेरून जाताना दिसते. मात्र, ते पीपीई कीट नसून कुर्ता-पायजमा आहे, असे एनआयएने सांगितले. ही व्यक्ती सचिन वाझेच असून त्यांनी ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने चेहरा झाकून घेतला आहे, असे एनआयएने म्हटले आहे.


लॅपटॉपमधील डाटा डिलीट
एनआयएने सचिन वाझे यांच्या कार्यालयातून त्यांचा लॅपटॉप जप्त केला. मात्र, या लॅपटॉपमधील सर्व डाटा आधीच डिलीट केला आहे. चौकशीत सचिन वाझे यांच्याकडे त्यांचा मोबाईल फोन मागण्यात आला तेव्हा त्यांनी फोन हरवला आहे, असे सांगितले. पण, सचिनचा फोन हरवला नसून त्यांनी तो फेकून दिला आहे, असा एनआयएचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER