सचिन वाझे निलंबित

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Industrialist Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटक असलेली कर सापडणे आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे (Sachin Waze) यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा एनआयएने अटक केली व सध्या ते रिमांडवर एनआयएच्या कोठडीत आहेत. वाझे याना अटक झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्याची मागणी होत होती. विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवल्यानंतर वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर एनआयएने वाझे यांची चौकशी करत शनिवारी रात्री त्यांना अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER