वाझे वापरत असलेल्या गाड्या! पोलीस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांबाबत अजितदादा म्हणाले होते…

Ajit Pawar

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार (Scorpio car) आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबई पोलिसात साधे एपीआय असलेल्या सचिन वाझेंकडे मर्सिडीज कार असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात मर्सिडीज, इनोव्हा, स्कार्पिओ अशा महागड्या गाड्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. या प्रकरणात समोर आलेल्या या महागड्या गाड्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांबाबत गेल्याच महिन्यात केलेले भाष्य आठवल्याशिवाय राहात नाही.

मुंबईत असताना मला काही पोलीस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत ३५ लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता समजले की, उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे अजित पवार म्हणाले होते. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे.

पोलीस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणते वाहन वापरतात आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझे प्रकरण : ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER