सचिन वाझेने असा कुठला गौप्यस्फोट केला, की पवारांची प्रकृती बिघडली?

Sharad Pawar - Sachin Vaze - Maharashtra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. उद्या पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. अशात दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख नवीनकुमार जिंदल यांनी शरद पवारांवर टीका केली.

त्यांनी पवारांच्या पोटदुखीच्या त्रासाचा संबंध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्युप्रकरणात एनआयएने अटक केलेल्या सचिन वाझेसोबत जोडला. अटक केल्यापासून वाझे दररोज नवनवीन माहिती एनआयएला देत आहे. यावरून बोलताना जिंदल यांनी पवारांवर निशाणा साधला. सचिन वाझेने एनआयएला (NIA) अशी कोणती माहिती दिली की, पवारांची अचानक प्रकृती बिघडली? त्यांना पोटात दुखायला लागलं आणि रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.

आता तर असं वाटतंय की…दाल में कुछ काला  नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है, असं ट्विट नवीनकुमार यांनी केलं. याशिवाय, पवारांच्या अचानक पोटदुखीमुळे पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल असं का वाटतंय, असंही कुमार यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button