सचिन वाझेंकडे आहे हजारो कोटींची संपत्ती ! – किरीट सोमय्या

Kirit Somiya - Sachin Vaze - Maharastra Today

मुंबई :- वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे शिवसेनेच्या नेत्यांसोबत आर्थिक संबंध आहेत. वाझे यांच्याकडे पाच हजार कोटींची संपत्ती आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात एक सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे यांच्याकडे इतकी संपत्ती आली कशी, असा प्रश्न त्यांनी केला. सोमय्या म्हणालेत, सचिन वाझे आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांचे आर्थिक संबंध आहेत.

ठाण्यातील एका शिवसेना नेत्याबरोबर सचिन वाझे (Sachin Vaze) यांची बांधकाम क्षेत्रात भागीदारी आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या अडचणी कमी होण्याचे संकेत नाहीत. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याचा आरोप झाल्यानंतर आता सचिन वाझे यांच्या संपत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय माशेळकर आणि विजय गवई या दोघांची सचिन वाझेंशी व्यावसायिक भागीदारी आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

या कंपन्यांमध्ये आहे सचिन वाझे यांची भागीदारी

मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, टेकलीगल प्रायव्हेट सोल्युशन्स लिमिटेड आणि डिजी नेक्स्ट मल्टीमिडिया लिमिटेड अँड अदर्स या व इतर काही कंपन्यांमध्ये सचिन वाझे भागीदार आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. २००४ मध्ये ख्वाजा युनूस प्रकरणी निलंबित झाल्यानंतर सचिन वाझे यांनी काही व्यवसाय केले. त्यातून त्यांनी किती संपत्ती गोळा केली हे अद्याप कळले नाही.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावे ; किरीट सोमय्या यांची मागणी 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER