सचिन वाझे प्रकरण १०० नव्हे, १००० कोटींचे; भाजपाच्या नेत्याचा आरोप

Kirit Somiya - Sachin Waze - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ‘टार्गेट’बाबत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला १०० कोटी रुपयांचे टार्गेट दिले होते, या आरोपानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला की, हे प्रकरण १०० कोटींचे नसून १००० कोटींचे आहे.

माजी खासदार किरीट सोमय्यांनी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेतली. ट्विट करून माहिती दिली – ‘एक हजार कोटींहून अधिकच्या सचिन वाझे खंडणी गँगसंदर्भात आज ईडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये बेनामी, ऑफशोर, रोकड व्यवहारांचा समावेश आहे. या प्रकरणी अनिल देशमुख, परमबीर सिंग, अनिल परब यांची चौकशी गरजेची आहे. ईडी या व्यवहारांची चौकशी करेल अशी आशा आहे.’

सचिन वाझे गँगने हजार कोटी रुपयांची वसुली केली. पैसे कुठे गेले याची चौकशी एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, कंपनी मंत्रालय आणि आयकर विभागानं करण्याची गरज आहे, असे सोमय्या म्हणाले. यामुळे या प्रकरणात केंद्राच्या आणखी तपास यंत्रणा लक्ष घालू शकतात. आणखी धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास एनआयएने हाती घेतल्यानंतर बरीच महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER