सचिन वाझे प्रकरण : आता ‘ती’ फाईल अमित शहांकडे; ठाकरे सरकारला आणखी एक धक्का?

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत.

वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.अंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास सचिन वाझे करत होते. त्यांच्यावर विरोधकांनी आरोप करताचा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) वाझेंची पाठराखण केली. मात्र एनआयएनं तपास हाती घेत थेट वाझेंनाच अटक केली. एनआयएनं या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानं ठाकरे सरकारला धक्का बसला. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास हाती घेणाऱ्या एनआयएनं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील स्वत:कडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आवश्यक परवानग्या गृह मंत्रालयाकडून घेण्याचं काम सुरू झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती.

त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची तयारी एनआयएने सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने परवानगी दिल्यास एनआयए मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू करेल. त्यासाठी गृह मंत्रालयाला ठाकरे सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. त्यामुळे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारपाठोपाठ आणखी एका प्रकरणाचा तपास एनआयएच्या हाती जाईल. तसे घडल्यास तो ठाकरे सरकारसाठी आणखी एक धक्का असणार आहे.

ही बातमी पण वाचा : वाझे वापरत असलेल्या गाड्या! पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्यांबाबत  अजितदादा म्हणाले होते … 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER