सचिन वाझेची पुन्हा तब्येत बिघडली; सूत्रांची माहिती

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वाझेला गेल्या महिन्यात NIA ने अटक केली. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास NIAचे अधिकारी वाझेला रुग्णालयात घेऊन गेले.

सूत्रांनी सांगितले की, वाझेची (Sachin Waze) तपासणी केली गेली. नंतर त्याला पाठवले. संबंधित अधिकाऱ्यांना तपासणीचा रिपोर्ट दिला जाईल. अटकेनंतर वाजेला जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. अंबानीप्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणी NIAच्या ताब्यात असलेला सचिन वाझे याची तब्येत पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली. नऊ दिवसांपूर्वी रात्री १०.३०च्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझेला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेले होते. उपचार झाल्यानंतर रात्री १.३० च्या सुमारास परत आणल्याची माहिती मिळाली होती.

मात्र, आज वाझेच्या छातीत दुखू लागल्याने त्याची रुग्णालयात तपासणी करून परत पाठवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button