सचिन वाझेचा साथीदार एपीआय रियाज काझीला अटक!

Maharashtra Today

मुंबई : सचिन वाझेचा साथीदार एपीआय रियाज काझी (Riaz Qazi) याला अटक केली आहे. रियाज काजी याची एनआयए (NIA)अधिकाऱ्यांनी अनेक वेळा चौकशी केली होती. सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाझ काझी NIAच्या रडारवर आले होते. सचिन वाझे (Sachin Vaze) याचा सहकारी पीएसआय रियाज काझी याला NIAने कटात सामील असल्यामुळे व पुरावे नष्ट करण्यामागे भूमिका बजावल्यामुळे अटक केली आहे.

एपीआय रियाझ काझी कोण?

रियाझ काझी हे २०१०च्या PSI बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी याची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. नंतर त्याची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.

PSIवरून API पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी याची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या CIU पथकात करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेनी CIU पथकाचे इंचार्जचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझेसोबत काम करत होते. वाझेशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझीची ओळख आहे.

कंगना-ह्रतिकपासून, अर्णब गोस्वामीला अटक करण्यापर्यंत भूमिका

CIU पथकाने केलेल्या अनेक प्रकरणांच्या तपासात सचिन वाझेसोबत रियाझ काझी आणि API होवोळदेखील सहभागी होते. यामध्ये TRP घोटाळ्याचा तपास, डिसी अवंती कार घोटाळा, फेक सोशल मीडिया फॉलोवर्सप्रकरण आणि कंगना-हृतिक वाद प्रकरणाचा समावेश आहे. विशेषतः अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करताना CIU पथकाने बजावलेल्या भूमिकेत रियाझ काझी याचाही वाझे यांच्यासोबत सहभाग होता. ज्या गाड्या गुन्ह्यात वापरल्या त्यांच्या नंबरप्लेट्स गुन्ह्याच्या दिवशी वारंवार बदलल्या होत्या. या नंबरप्लेट्स बनवून घेण्यात रियाझ काझीचा सहभाग आहे, असा NIAचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button