सचिन वझे तणावात होते, त्यांना अडकवण्यात आले; भावाने दिली प्रतिक्रिया

Sachin Vaze - Sudharm Vaze - Maharashtra Today

मुंबई : २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांचे नाव समोर आले. सचिन (Sachin Vaze) यांचे भाऊ सुधर्म वझे (Sudharm Vaze) हे दोन दिवसापूर्वी मुंबईत येऊन गेले. सचिन हे तणावात होते, त्यांना अटककरून हिरेनप्रकरणात अडकविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया सुधर्म वझे यांनी दिली. कालचा Whats App स्टेट्स पाहून आम्हाला काळजी वाटली. मात्र, काल उशिरा रात्री अटक केल्याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती तपास यंत्रणेने दिलेले नाही, असे सुधर्म वझे यांनी सांगितले.

सचिन वझे यांच्या अटकेमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यात आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्कॉर्पिओ ठेवून दुसऱ्या इनोव्हातून आलेला चालक आणि एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी ‘एनआयए’च्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. पोलीस अधिकारीही रडारवर असल्याने आयुक्तालयात भीती निर्माण झाली आहे.

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणात संशयास्पद असलेले सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. यात आणखी ५ ते ७ जणांचा समावेश आहे. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे ‘एनआयए’ (NIA) सुत्रांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER