सचिन वाझेला अडीच लाखांचा हप्ता देत होता एक बारवाला; आता ईडीच्या रडारवर

Sachin Vaze - ED

मुंबई :- सचिन वाझेला (Sachin Vaze) दरमहा अडीच लाख रुपयांचा हप्ता देत होतो, असे अंधेरीच्या एका बारमालकाने सीबीआयला दिलेल्या जबाबात सांगितले. तो बारमालक आता ईडीच्या (ED) रडारवर आला आहे. ईडीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील १०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाबाबत मुंबईतील पाच बारमालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या बारमालकांमध्ये अंधेरीतील त्या बारमालकाचा समावेश आहे.

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीबाबत आरोप केला होता. या आरोपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह आठ जणांचे जबाब नोंदवून अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या चौकशीत अंधेरी येथील एका बारमालकाने सीबीआयला सांगितले की, तो दरमहा सचिन वाझे या सध्या बडतर्फ पोलीस अधिकाऱ्याला अडीच लाख रुपये हप्ता देत होता. मात्र, ही रक्कम सचिन पुढे कुणाला द्यायचा याबाबत माहिती नाही.

ईडीनेदेखील याची गंभीर दाखल घेत मुंबईतील बारमधून दरमहा किती हप्ता दिला जात होता याची चौकशी करण्यासाठी मुंबईतील बारमालकांची यादी तयार करून बारमालकाचा जबाब नोंदवणे सुरू केले आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुखांच्या अडचणीत पुन्हा वाढ; EDकडून निकटवर्तीयाच्या घरी छापेमारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button