सचिन वाझे बडतर्फ

Sachin Vaze

मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याला स्फोटकप्रकरण आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्याप्रकरणात अटक झाल्यानंतर बडतर्फ करण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्तांनी या संबंधित आदेश काढले आहेत.

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरजवळ एका एसयूव्हीमध्ये स्फोटके आढळली होती. या प्रकरणाचा तपास सचिन वाझे करत होता. ज्या गाडीत ही स्फोटके आढळून आली त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा काही दिवसांत संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधकांनी अधिवेशनात जोरदार गदारोळ घातला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.

एनआयएने (NIA) केलेल्या तपासात उघड झाले की, स्फोटकप्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणात सचिन वाझे याचाच सहभाग आहे. एनआयएने सचिन वाझे याला अटक केली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी सचिन वाझे याच्यावर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button