सचिन वाझे यांना NIA कडून अटक, अंबानी घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणात अटक

sachin-vaze-news-sachin-vaze-arrested-by-nia-after-12-hours-of-questioning
sachin-vaze-news-sachin-vaze-arrested-by-nia-after-12-hours-of-questioning

मुंबई : मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणात एनकाउंटर तज्ञ सचिन वाझे (Sachin Vaze) यांची शनिवार (13 मार्च) सकाळपासून एनआयएकडून चौकशी सुरू होती आणि जवळपास 12 तास चौकशी करण्यात आल्या नंतर त्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. शनिवारी रात्री 11.50 वाजता एनआयएकडून 12 तास चौकशी केल्यानंतर वाझे यांना अटक करण्यात आली.

एनआयएच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार,”25 फेब्रुवारी रोजी कार्मिकल रोडजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन ठेवण्याच्या भूमिकेच्या आणि सहभागासाठी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.”

त्यांना भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 286 ( जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे), 465 (खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे), 473 (दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती), 506 (2) (दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे), 120 B (गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे) आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे ह्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

API सचिन वाझे संशयाच्या भोवऱ्यात फसले आहेत. सचिन वाझे यांनी ठाणे कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता, तो ठाणे सत्र न्यायालयाने तात्पुरता फेटाळला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी १९ मार्चला होईल. जामीन फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट म्हटले की – त्यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे आहेत, कोठडीतील तपासाची गरज आहे. हा एक अतिशय गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणात, गुन्हेगारी, कटकारस्थान दिसते आहे. प्राथमिकदृष्ट्या हे सर्व अर्जदाराच्या विरोधात आहे. एटीएसनेही कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. म्हणूनच अर्जदार सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा तपास

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणाचा तपास ATS करत आहे. शिवाय, केंद्रीय तपास यंत्रणा NIA कडूनही तपास सुरू आहे. वाझे यांना अटक करून एटीएसच्या तपासाला गती मिळालेली दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER