सचिन वाझेने तो राहात असलेल्या सोसायटीमधील सीसीटीव्हीचे फुटेज पळवल्याचा संशय

Sachin Vaze

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारबाबत तपासात एमआयएला संशय आहे की, या प्रकरणातील मुख्य संशयित व API सचिन वाझे (Sachin Vaze) याने तो राहात असलेल्या ‘साकेत’ सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केले.

एका वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली की, या प्रकरणी साकेत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्रे लिहिली आहेत. यामध्ये त्यांनी आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला, अशी माहिती दिली. सोसायटीने मुंबई पोलिसांना दोन पत्रे लिहिली आहेत. सचिन वाझेने त्याचे सहकारी रियाझ काझी यांच्यामार्फत साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पहिले पत्र
सचिन वाझे याच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले. त्यासंदर्भात त्याने सोसायटीला पत्र लिहिले होते. मात्र पत्रावर कुठेही पोलिसाचा सही-शिक्का नसल्याने सोसायटीने त्या टीममधल्या सर्वांची नावे, मोबाईल नंबर आणि सही त्या पत्रावर घेतली.

दुसरे पत्र
या प्रकरणी साकेत सोसायटीला संशय आल्याने ४ मार्चला सोसायटीने स्थानिक राबोडी पोलीस स्टेशनला एक पत्र लिहिले. यामध्ये आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज CIU युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी घेतले असल्याने, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून कळवतो आहे, असे म्हटले आहे.

तिसरे पत्र
हे पत्र ठाणे एटीएसने लिहिले आहे. यात साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही आम्हाला हवे असून, १७ फेब्रुवारी रात्री १२ पासून, २५ फेब्रुवारी रात्री ११ पर्यंतचे फुटेज आम्हाला हवे असल्याचे म्हटले आहे. मात्र ते फुटेज एटीएसला मिळाले नाही! कारण, सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर CIU युनिटने आधीच नेला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER