Sachin Vaze Arrested : वाझेप्रकरणात बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य!

balasaheb thorat - Sachin Waze-Maharastra Today

अहमदनगर : विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपासासाठी आग्रह करणे म्हणजे आम्हाला काळजीच वाटते, की यात राजकारण तर नाही ना? सचिन वाझेप्रकरणात काळजीच्या गोष्टी वाटते. सध्या या प्रकरणात बोलणे योग्य नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. ते संगमनेरमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांनंतर पत्रकारांशी बोलत होते.

भाऊसाहेब थोरात यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यात आज विविध कार्यक्रम झाले. यात साखर कारखाना इथेनॉल प्रकल्प उद्घाटन व भाऊसाहेब थोरात स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यासह माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

सरकार बदलत असतात, मात्र पोलीस यंत्रणा आहे तीच असते. महाराष्ट्र आणि मुंबईची पोलीस यंत्रणा ही जगप्रसिद्ध आहे. स्कॉटलँड यार्डनंतर आपले नाव घेतले जाते. पोलिसांचे मनोबल खच्ची होणार नाही, याची काळजी सत्ताधारी आणि विरोधकांनी घ्यायला हवी. विरोधक सत्तेत होते तेव्हा हेच पोलीस दल होते. पोलीस दल सक्षम आहे, यावर आमचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी सचिन वाझेप्रकरणी दिली.

“राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असताना आपण मात्र बेफिकीर झालो आहोत. ही बेफिकरी आपल्याला त्रासदायक ठरणार आहे.” असे बाळासाहेब थोरात म्हणाले. सरकारकडून केवळ अपेक्षा करण्यापेक्षा त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. स्वत: आणि कुटुंबासाठी कोरोना नियमावलीचे पालन करावे.” असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER