सचिन वाझे प्रकरणात ; देवेंद्र फडणवीसांनी घेतले थेट उद्धव ठाकरेंचे नाव ; दिल्लीतून घणाघाती आरोप

sachin-vaze-arrest-case-devendra-fadnavis-met-amit-shah-at-navi-delhi-

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेनेच्या (Shivsena) दोन नेत्यांविरोधात कारवाईची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव घेत सचिन वाझे याच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. ‘वसुलीच्या रॅकेटमध्ये सचिन वाझे यांचं नाव आलं होतं. अशा स्थितीतही मी मुख्यमंत्रिपदी असताना सचिन वाझे यांची पुन्हा नियुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे हे माझ्यासोबत बोलले होते. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यास माझा विरोध होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शिवसेनेसोबत सचिन वाझे याचे अतिशय जवळेचे संबंध होते. एवढंच नाही तर अनेक नेत्यांसोबत त्याचे व्यवसायिक संबंध होते. हे सर्व सचिन वाझे एकटा करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत काही जण आहेत. हे एका पोलीस अधिकाऱ्याचं काम नाही, तर सरकारची जबाबदारी आहे. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : रात्री मोठ्या राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील भाजप नेते दिल्लीत अमित शहांच्या भेटीला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER