‘त्या’ मर्सिडीज गाडीवरून नाना पटोले आणि आशिष शेलारांमध्ये वादंग

Nana Patole - Ashish Shelar - Maharastra Today

मुंबई :- मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. वाझेंना अटक झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

एनआयएने (NIA) जप्त केलेल्या मसिर्डीज कारवरून भाजपचे (BJP) आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.

केंद्रीय चौकशी यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे ते काहीही आरोप करत आहेत. त्यांना काय चौकशी करायची असेल तर ती करावी, असं प्रत्युत्तर पटोले यांनी दिलं. तसंच, ‘भाजप कार्यकर्त्याचे नाव या प्रकरणात समोर येत असल्याने शेलार यांनी खोटे आरोप केले असून यात काहीच तथ्य नाही. सुशांत सिंग प्रकरणातसुद्धा महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम भाजपनं केलं आहे. मर्सिडीज कार जर आम्ही दुसऱ्याला घेऊन दिली असेल तर आमची चौकशी करा. नोटा मोजणारे मशीन गाडीत सापडले आहे, शेलार यांनी आम्हालाही असे मशीन आणून द्यावे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

केंद्रीय तपास यंत्रणा हा भाजपचा पोपट आहे. त्याचा कसा वापर करायचा तो करावा. त्यांना काही चौकशी करायची असेल तर करा, आमचे घर काचेचे नाही. खोटे आरोप करून बदनाम करू नका; अन्यथा आम्हालाही वेगळे मार्ग आहेत.’ असा इशाराही नाना पटोले यांनी शेलारांना दिला.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझे प्रकरणात ;   देवेंद्र फडणवीसांनी घेतले  थेट उद्धव ठाकरेंचे  नाव ;  दिल्लीतून घणाघाती आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER