सचिन तेंडूलकरला कोरोना

Maharashtra Today

जगातील सर्वात यशस्वी फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने आपण कोरोना पॉसिटीव्ह (Corona Positive) असल्याचे स्वतःच सोशल मीडियाद्वारे (Social Media) जाहीर केले आहे. यासंदर्भात आपल्या व्टिटमध्ये सचिनने म्हटलेय की, मी चाचणी करुन घेतली असून मला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन असुन डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना व खबरदारी पाळत आहे. यासोबतच सचिनने रुग्णसेवा करणाऱ्या सर्व कौरोना योध्द्यांना धन्यवाद दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER