संघासाठी योगदानात सचिन तेंडूलकर इतरांपेक्षा कितीतरी पुढे

Maharashtra Today

क्रिकेटप्रेमी ज्याला देव मानतात असा जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) आज वाढदिवस. त्याचे असंख्य विक्रम आहेत आणि लोकांनी त्याची पारायणेसुध्दा केली आहेत पण सचिनचा एक विक्रम फारच थोड्या लोकांना माहित आहे आणि त्याबाबत तो इतर दिग्गज फलंदाजांपेक्षा कितीतरी पुढे आहे.

हा विक्रम म्हणजे कसोटी आणि वन डे सामन्यात सचिनने सर्वाधिक वेळा आपल्या संघासाठी डावात सर्वाधिक धावा (Highest score in an Innings) केल्या आहेत. म्हणजे डावात सर्वाधिक वेळा सर्वोच्च खेळी सचिनच्या नावावर आहेत.

वन डे इंटरनॅशनल सामन्यांचा विचार केला तर तब्बल 129 डावात सचिनचीच खेळी भारतातर्फे सर्वोच्च राहिली आहे. याबाबतीत दुसऱ्या स्थानावरील सनथ जयसुर्यापेक्षा तब्बल 45 डावांनी सचिन पुढे आहे. सनथ जयसूर्याने 84 डावात श्रीलंकेसाठी सर्वोच्च खेळी केल्या आहेत.

वन डे इंटरनॕशनलमध्ये सर्वाधिक वेळा डावात सर्वाधिक धावा
129- सचिन तेंडूलकर
84- सनथ जयसूर्या
82- कुमार संगकारा
79- जेकस् कॕलिस

कसोटी सामन्यांमध्येही सचिनच डावातील सर्वोच्च खेळींबद्दल 13 डावांच्या फरकाने आघाडीवर आहे. सचिनने 78 कसोटी डावात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत आणि दुसऱ्या स्थानावरील वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचे असे 65 डाव आहेत.

कसोटी डावात सर्वाधिक वेळा सर्वोच्च खेळी

78- सचिन तेंडूलकर
65- ब्रायन लारा
60- सुनील गावसकर
60- शिवनारायण चंद्रपॉल

याप्रकारे कसोटी सामने असोत की वन डे सामने, सचिन तेंडूलकर डावात सर्वाधिक योगदान देण्याबाबत इतरांपेक्षा कितीतरी पुढे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button