सचिन हा कोणत्याही परिस्थितीतील उत्तम फलंदाज- शेन वॉर्न

Sachin Tendulkar and Shane Warne

मेलबर्न :-क्रिकेटमधील सर्वांत सफल फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियन शेन वॉर्न याने कोणत्याही परिस्थितीत उत्तम फलंदाजी करू शकणारा सर्वांत चांगला फलंदाज म्हणजे सचिन तेंडुलकर, असे मास्टर ब्लास्टरबद्दल प्रशंसोद्गार काढले आहेत. आपल्या समकालीन फलंदाजांपैकी सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा हे दोघे इतर फलंदाजांपेक्षा बऱ्याच पुढे असल्याचे आणि स्टिव्ह वॉ हा विजेता असण्यापेक्षा चांगला संकटमोचक असल्याचेही त्याने म्हटले आहे.

त्यांच्या काळात सचिन आणि वॉर्न हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते आणि शारजात सचिनने वॉर्नची अशी धुलाई केली होती की, त्याला स्वप्नातही सचिन दिसत होता; पण आता सचिन हाच त्याचा सर्वांत  आवडीचा फलंदाज आहे. इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी थेट संवाद साधताना त्याने ही मते मांडली.

आपल्या काळातील सर्वोत्तम फलंदाजाबद्दल बोलताना तो म्हणाला की, कोणत्याही परिस्थितीत चांगली फलंदाजी करणारा फलंदाज असा विचार केला तर सचिन तेंडुलकर व ब्रायन लारा ही  दोन नावं समोर येतात; पण त्यातूनही निवड करायची झाली तर मी सचिनचीच निवड करेन. मात्र शेवटच्या दिवशी ४०० धावांचा पाठलाग करायचा असेल तर माझी निवड लारा असेल. आपल्या फलंदाजीचे उत्कृष्ट तंत्र आणि निर्धारी वृत्तीसाठी ओळखला जाणारा आपला माजी कर्णधार स्टीव्ह वॉबद्दल तो म्हणाला की, तो संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारा संकटमोचक होता. त्याने

आपल्या समकालीन खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट ऑस्ट्रेलियन संघसुद्धा निवडला असून या संघाचे नेतृत्व अलेन बोर्डरकडे दिले आहे. वॉर्नच्या या संघात हेडन व मायकेल स्लेटर हे सलामीवीर, मधल्या फळीत रिकी पॉन्टिंग, मार्क, अलेन बोर्डर व स्टिव्ह वॉ, यष्टिरक्षक गिलख्रिस्ट, जलद गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी व ब्रुस रीड आणि फिरकी गोलंदाज टीम मे यांची निवड केली आहे.

टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी २३ जुलैपासून


Web Title : Sachin tendulkar is great batsman in every condition warne

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)