सचिन तेंडूलकर दवाखान्यात भरती

Sachin Tendulkar i

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. स्वतः सचिननेच ही माहिती दिल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. सचिनने आपल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलेय की, तुम्हा सर्वांच्या सदिच्छा व प्रार्थनांसाठी धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून मी दवाखान्यात भरती झालो आहे. काही दिवसातच मी घरी परतेल अशी आशा आहे. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

सचीनने ट्विटचा शेवट करताना सर्व भारतियांना व आपल्या संघबांधवांना विश्वविजेतेपदाच्या दशकपूर्तीबद्दल अभिनंदनही केले आहे.

सहा दिवसांपूर्वी सचिनने आपण कोरोना पाॕझिटिव्ह असून होम आयसोलेशनमध्ये असल्याचे स्पष्ट केले होते.

यासंदर्भात आपल्या आधीच्या व्टिटमध्ये सचिनने म्हटले होते की, मी चाचणी करुन घेतली असून मला कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन असुन डाॕक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना व खबरदारी पाळत आहे. यासोबतच सचिनने रुग्णसेवा करणाऱ्या सर्व कौरोना योध्द्यांना धन्यवाद दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button