सचिन तेंडूलकरची ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरसाठी एक कोटींची देणगी

Sachin Tendulkar - oxygen concentrators - Maharashtra Today
Sachin Tendulkar - oxygen concentrators - Maharashtra Today

पॕटरसन कमिन्स, ब्रेट ली, राजस्थान राॕयल्स आणि दिल्ली कॕपिटल्सनंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही (Sachin Tendulkar) कोरोनाग्रस्तांच्या (Corona). उपचारासाठी ‘मिशन ऑक्सिजन’ (Mission Oxygen) उपक्रमाला आॕक्सिजन काॕन्सेन्ट्रेटर घेण्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही मदत देशभरातील दवाखान्यांसाठी आहे. ‘मिशन आॕक्सिजन’ ही दिल्ली एनसीआर भागातील काही उद्योजकांनी एकत्र येत कोरोना रुग्णांना आॕक्सिजन पुरवठ्यासाठी हाती घेतलेली मोहीम आहे.

सचिन स्वतः काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित होता आणि त्यावरील उपचारानंतर सावरल्यावर आपल्या वाढदिवशी त्याने देशभरातील नागरिकांना प्लाज्मादान व रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

स्वतः सचिनने आपल्या ट्विटर हँडलवरुन या देणगीची घोषणा केली आहे. त्यासंबंधीच्या आपल्या संदेशात सचिनने म्हटलेय की आता एकजूटीने काम करायची वेळ आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. अशावेळी गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांना आॕक्सिजन पुरविणे गरजेचे आहे. अशा संकटसमयी लोक मदतीसाठी पुढे येत आहेत ही समाधानाची बाब आहे. साधारण अडीचशे उद्योजकांनी एकत्र येत मिशन अॉक्सिजन ही मोहिम सुरू केली आहे. त्यांना माझी ही मदत आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांनी देशभरातील दवाखान्यांत मदत पोहोचेल. या संकटाचा मुकाबला करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे सचिनने म्हटले आहे.

दरम्यान, इस्टोनिया क्रिकेट संघटनेनेही कोरोनाशी लढण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button