आई-बाबा झालेल्या हार्दिक-नताशाचे मन:पूर्वक अभिनंदन ; सचिन तेंडुलकरच्या शुभेच्छा

Sachin Tendulkar

मुंबई : भारताचा अष्पैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोविच (Natasha Stankovich) यांना गुरूवारी पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितले.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. आई-बाबा झालेल्या हार्दिक-नताशाचे मन:पूर्वक अभिनंदन असे म्हणत त्याने अभिनंदन केले.

ही बातमी पण वाचा : हार्दिक पांड्याला पुत्ररत्न ; शेअर केला फोटो

दरम्यान हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशी पोस्ट हार्दिकने केली होती .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER