…तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील ; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेस नेत्याचा टोला

Sachin Sawant-Dhananjay Munde

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे . मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्र भाजपाच्या (BJP) महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीवर काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपातील काही नेते टेंशनमध्ये आले असतील, असं ट्विट काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केले.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, असं उमा खापरे यांनी सांगितले. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER