ही भाजपाची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?; Save Merit Save Nation चा दाखल देऊन काँग्रेसचा आरोप

sachin swant-bjp

मुंबई :- मराठा समाजाला (Maratha Community) शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालाय (Supreme court) रद्द केला. त्यानंतर राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. राज्य सरकारने नीट बाजू मांडली नसल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला. तर आरक्षण रद्द व्हावं म्हणून भाजपाकडून (BJP) प्रयत्न केले गेले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी Save Merit Save Nation संघटना भाजपाशी आणि संघाशी संबंधित असल्याचे सांगून ‘ही भाजपाची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?’ असा प्रश्नवजा आरोप केला आहे.

सचिन सावंत यांनी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन संघटनेचे मूळ संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी असल्याची कागदपत्रे ट्विट केली आहेत. “मराठा आरक्षणाला निकराने विरोध करणाऱ्या Save Merit Save Nation संघटनेचे मूळ संस्थापक ज्यांनी स्वतःचा पत्त्यावर ही संस्था स्थापन केली, ते डॉ अनुप मरार हे भाजपाचे पदाधिकारी कसे? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे. चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?,” असा सवाल सावंत यांनी केला आहे.

“डॉ. अनुप मरार व इतर संघाशी संबंधित या संस्थेचे विश्वस्त नागपुरात मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? न्यायालयात हे लोक मराठा आरक्षणाला विरोध करत होते, तेव्हा भाजपा गप्प का होती? हे मूक समर्थन होते का? मागून पाठिंबा दिला का? महाराष्ट्र भाजपाने उत्तर द्यावे,” असे आव्हान सावंत यांनी दिले आहे.

“भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली? मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या #SaveMeritSaveNation या संस्थेचे भाजपा व संघाचे नागपूर कनेक्शन आहे. भाजपा पदाधिकारी मराठा आरक्षणविरोधामध्ये न्यायालयीन लढाईत सहभागी होते,” असा आरोप सावंत केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button