राजस्थानमध्ये राजकीय भूंकप होणार?, सचिन पायलट-ज्योतिरादित्य शिंदेंच्या भेटीला

sachin-pilot-meet-bjp-leader-jyotiraditya-scindia

नवी दिल्ली : मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. नुकतंच सचिन पायलट यांनी भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीनंतर राजस्थानमधील गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन पायलट यांनी नुकताच ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. सचिन पायलट आणि शिंदे हे एकमेकांचे जुने मित्र आहेत. विधीमंडळच्या बैठकी आधी शिंदे आणि पायलट यांच्या भेटीने गेहलोत सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट आणखीनच वाढत असल्याचं सांगितलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER