भाजपाच्या ‘त्या’ नेत्याचे बोलणे तेंडुलकरशी झाले असावे, सचिन पायलटचा टोमणा

Sachin Pilot

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे (UP News) मोठे काँग्रेस (Congress) नेते जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. या गोंधळात, भाजपाच्या नेत्या रिता बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांनी ‘पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझे त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे’ असा दावा केल्याने खळबळ उडाली. यावर सचिन पायलट यांनी बहुगुणा – जोशी यांना टोमणा मारला – त्यां सचिन तेंडुलकरशी बोलल्या असाव्या!

दरम्यान, सचिन पायलट हे दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत. प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांच्या बैठकीची वेळ ठरली नाही. दुसरीकडे पायलट यांच्या दिल्ली वारीमुळे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांनी मंत्री आणि आमदारांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. मंत्री आणि आमदारांच्या प्रत्येक हालचालींची माहिती देण्यासाठी विश्वासू शिलेदार निवडले आहेत. सचिन पायलट यांच्या घरी ८ आमदारांची बैठक झाली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

माजी काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. राजस्थानच्या काँग्रेसवरही याचा परिणाम झाला आहे. सुमारे १० महिन्यानंतर पुन्हा सचिन पायलट यांनी जाहीरपणे पक्षाच्या नेतृत्वासमोर नाराजी उघड केली आहे. काँग्रेसच्या ३ सदस्यीय कमिटीचा अद्याप रिपोर्ट आला नाही. १० महिने झाले तरी मला दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button