सा. बां. विभाग : खोट्या बिलांचे पैसे दिलेत, कोट्यवधींचा घोटाळा; भातखळकरांचा आरोप

Ashok Chavn-Atul Bhatalkar

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांना खोट्या बिलांचे ७० – ८० कोटी रुपये दिलेत, असा आरोप भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पत्रपरिषदेत केला. ही बिलं  २०१० ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यंतची आहेत. दोन ते तीन महिन्यांत  सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिलं पास केली. ही बिलं आधी पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी झाली पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा या प्रकरणी १५ दिवसांत कोर्टात जाऊ, असा इशारा भातखळकर यांनी दिला.

३५ टक्के कमिशन !

एकट्या मुंबईतून ७० केटींची बिलं पास झाली. या घोटाळ्याचे तार नांदेडपर्यंत आहेत, असे म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्याकडे इशारा केला. कोरोना काळात पैस नव्हते तर मग बिलं पास कशी केली? ही बिलं मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची मुळात खोटी आहेत. ३५ टक्के ‘कमिशन’ने ही बिलं ठाकरे सरकारने पास केली, असा आरोप भातखळकर यांनी केला.

तिजोरी जनतेसाठी रिकामी, खाबूगिरीसाठी मात्र ओघ !

ठाकरे सरकारची तिजोरी जनतेसाठी खाली असली तरी खाबूगिरीसाठी मात्र इथून ओघ सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात खोट्या बिलांचा ७० कोटींचा घोटाळा झाला. सरकारने चौकशी करावी; अन्यथा आम्ही कोर्टात याचिका दाखल करू, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER