मोटेरा स्टेडीयमला मोदींचे नाव : भक्तांनी पंतप्रधानांना अजूनच लहान केले आहे – शिवसेना

पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही.

saamana-editorial-on-sardar-patel-cricket-stadium-renamed-narendra-modi-stadium

मुंबई :- गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियमचे (Motera Stadium) नाव बदलून आता नरेंद्र मोदी  (Narendra Madi) स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. या मुद्द्यावरून देशभरातील जनतेने तीव्र नाराजी दर्शवली आहे सोशल मीडियावर याचे पडसाद दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून (Saamana-Editorial) मोदींवर सडकून टीका केली आहे.

मोदी हे महान आहेतच. त्याविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण मोदी सरदार पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यापेक्षाही महान आहेत असे मोदीभक्तांना वाटत असेल तर त्यास अंधभक्तीची पुढची पायरी मानावी लागेल असेही सामनात म्हटले आहे.

मुळात सरदार पटेलांचे नाव (Sardar-patel-cricket-stadium) काढून मोदी यांचे नाव लावण्याचा प्रयत्न व खटाटोप ज्यांनी केला त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लहान केले आहे. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेतच, पण या काळातले एक बलदंड लोकप्रिय नेते आहेत. त्यांना लोकांनी प्रचंड बहुमत दिले आहे. बहुमत म्हणजे बेपर्वा वागण्याचा परवाना नाही. सरदार पटेल, पंडित नेहरू यांच्याकडे बहुमत होते ते देश घडविण्यासाठी. नेहरू यांनी आयआयटीपासून भाभा अणुशक्ती केंद्र, भाक्रा-नांगल योजना राष्ट्राला समर्पित केल्या. मोदी यांच्या काळात काय झाले, तर जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला सरदार पटेलांचे नाव होते ते पुसून मोदींचे नाव दिले, असे त्यांच्या भक्तांना इतिहासात नोंद करून हवे आहे काय? सरदार पटेलांचे कालपर्यंत गुणगान गाणारे हे लोक एका स्टेडियमच्या नावासाठी सरदारविरोधी होतात, हा निव्वळ व्यापार म्हणावा लागेल. अशा शब्दांत सामनातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके अकांडतांडव का करता ? हा बदल त्यांच्या गुजरातच्या जनतेने स्वीकारला आहे . पाच महापालिका निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला व भाजप विजयी झाला . सरदार पटेलांपेक्षा मोदी महान झाल्यानेच लोक त्यांना भरभरून मते देत आहेत . गुजरातलाच सरदार पटेलांविषयी आस्था नसेल तर इतरांनी विरोधाच्या टिपऱ्या का बडवायच्या ? असा खोचक टीकात्मक प्रश्न सामनातून विचारला आहे.

सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे –

सरदार पटेलांचे महत्त्व नव्या राजकारणात संपले आहे , उद्या नेताजी बोसही संपतील . महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वापरही मागच्या निवडणुकीत झालाच होता . आता ‘ गरज सरो , पटेल मरो ‘ हा त्याच नाटय़ाचा भाग आहे .

जगातली प्रत्येक मोठी गोष्ट गुजरातलाच करायची या ध्यासाने दिल्लीतील मोदी-शहांचे सरकार पछाडलेले दिसत आहे. त्यात काही चुकले असे वाटण्याचं कारण नाही. आपल्या मातीवर प्रेम असणे हा गुन्हा नाही, पण आपण देशाचे नेतृत्व करीत आहोत हे भान विसरून कसे चालेल! अशा मोठय़ा कामांची जंत्री मोठी आहे म्हणून वाजंत्री लावून सांगण्याची गरज नाही. आज हा विषय वाजंत्री लावून चर्चेला आला आहे तो जगातील सर्वात मोठय़ा क्रिकेट स्टेडियमला नरेंद्रभाई मोदी यांचे नाव दिल्यामुळे. गुजरातमध्ये मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून आता नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते आता मोदी यांचे नाव दिलेले मोटेरा स्टेडियम जगात सगळय़ात मोठे असेल. अशी खोचक टीका सामनातून केली आहे.

मोदी यांचे नाव या मोठय़ा स्टेडियमला दिले हा टीकेचा विषय कसा काय होऊ शकतो? –

मोदी यांचे नाव या मोठय़ा स्टेडियमला दिले हा टीकेचा विषय कसा काय होऊ शकतो? पण टीका यासाठी सुरू आहे की, मोटेरा स्टेडियमला आधी भारतरत्न सरदार पटेल यांचे नाव होते. ते बदलून मोदी यांचे नाव दिले. गुजरातमध्ये आधी सरदार पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला. अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ म्हणजे स्वातंत्र्य देवतेच्या पुतळय़ापेक्षा सरदार पटेलांचा पुतळा उंच आहे व काँग्रेसने अपमानित केलेल्या सरदारांचा मानसन्मान, उंची वाढविणारा हा पुतळा असल्याचे श्री. मोदी यांच्याकडून सांगण्यात आले. पटेल यांचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेस किंवा नेहरू-गांधी घराण्याने केला असे गेल्या पाचेक वर्षांत अनेकदा सांगण्यात आले, पण गुजरातमधील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून ते मोदी स्टेडियम करावे असे काही सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी सुचविल्याचे दिसत नाही. पटेल यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न नक्की कोण करीत आहे, ते यानिमित्ताने दिसले. असे आजच्या सामनात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : मला आता मोदी सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत – संजय राऊतांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER