सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’; शिवसेनेचे टीकास्त्र

CM Uddhav Thackeray - Kangana Ranaut

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा या प्रकरणावरून टीका केली आहे.

राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. महाराष्ट्रातील बेइमानांच्या पाठीशी जे उभे राहात आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतीलच, पण राज्याची ११ कोटी जनताही माफ करणार नाही, असे म्हणत शिवसेनेने कंगना आणि विरोधकांवर निशाणा साधला.

आजचा सामनातील अग्रलेख :
मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू नये. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाचे सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. याच मुंबईसाठी १०६ मराठी माणसांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्टाचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती भारताची आहे. पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती भारताची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील ११ कोटी मराठी जनतेस तर हा असा मुंबईचा अवमान देशद्रोहासारखा गुन्हा वाटतो. पण असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या मागे राष्ट्रभक्त मोदी सरकारचे गृहमंत्रालय सुरक्षाकवच घेऊन ठामपणे उभे राहते तेव्हा आपले १०६ हुतात्मेही स्वर्गात अश्रू ढाळत असतील. महाराष्ट्र हा सत्यवादी हरिश्चंद्राचा पूजक आहे. कुणी ऐऱ्यागैऱ्याने उठावे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून आव्हानाची भाषा करावी, याविरोधात महाराष्ट्राने एकवटायला हवे. तसेच भाजपा मुंबईचा आणि राज्याचा अवमान करणाऱ्यांना सरळ पाठिंबा देत आहे, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेने वेगळी वाट निवडली असली तरी पंतप्रधान म्हणून मोदींचा अवमान कदापि सहन करणार नाही, मोदी हे आज एक व्यक्ती नसून पंतप्रधान म्हणून संस्था आहेत. तेच राज्याराज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आणि राज्यांच्या प्रांतिक अस्मितेबाबत बोलता येईल. राजकीय अजेंडे पुढे राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांच्या राजद्रोहास पाठिंबा देणे हीसुद्धा हरामखोरीच म्हणजे मातीशी बेईमानीच आहे. महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेईमान लेकाचे या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये, इतकीच अपेक्षा, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER