बार उशिरापर्यंत सुरू होता खरे, पण आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? – सामना

CM Uddhav Thackeray - Bar - Sanjay Raut

मुंबई : अनलॉक – 5 मध्ये राज्य सरकारने हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरंट (Restaurant) सुरू करण्यास परवानगी दिली आणि दुस-याच दिवशी मुंबईच्या (Mumbai) गोरेगाव मध्ये उशिरापर्यंत सुरु असलेल्या बारवर पोलिसांनी छापा मारला व बार बालांना ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणावरून रान उठले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात एमपीएससीच्या परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलल्या नाहीत तर आंदोलन व वेळ आल्यास तलवारी काढू, असा इशारा दिला होता. या दोन्ही मुद्द्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य केलं आहे. तलवारी उपसण्याच्या बाषेतून रोजगार मिळणार आहे का असा प्रश्न उपस्थित करून गोरेगावच्या बारच्या कारवाईचे उदाहरण शिवसेनेचे मुखपत्र सामनातून दिले आहे. लोकांचा रोजगार पूर्णपणे गेला आहे. त्यामुळे घर, संसार चालविण्यासाठी, पोराबाळांचे पोट भरण्यासाठी समाजातील पांढरपेशा वर्ग गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारू लागला आहे. तर दुसरीकडे,आता ‘रेस्टॉरंट’ सुरू करताच पोलिसांनी हॉटेलवर धाडी टाकायला सुरुवात केली. गोरेगावच्या एका बारमध्ये 11 बारबाला नृत्य करतात. अशातच हा बार उशिरापर्यंत सुरू होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ते खरे आहे, पण हा जो मोठा वर्ग याच व्यवसायावर जगत होता, तो सात-आठ महिन्यांपासून कसाबसा अर्धपोटी अवस्थेत जिवंत राहिला आहे. आता त्यांच्या रोजगार व पोटापाण्याची व्यवस्था सरकार किंवा प्रशासन करू शकेल काय? असा प्रश्न सामनातून उपस्थित केला आहे.

तर,’जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पहावेच लागेल,’ असं म्हणत शिवसेनेनं दोन्ही राजांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर श्री. आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही असा टोला सामनातून लगावला आहे.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोजगार देणारा प्रत्येक व्यवसाय पुढचे सहा महिने चालू राहील, याची काळजी घेतलीच पाहिजे. कायद्याचे पालन कोण किती करतो, यावर बोलायचे म्हटले तर अनेकांचे वस्त्रहरण होईल. जगा आणि जगू द्या या मंत्रानेच सगळ्यांना जगविता येईल. तलवारी चालवून लोकांना रोजगार, उद्योग मिळणार असेल तर तसे सांगावे. पांढरपेशे लोक पोटापाण्यासाठी गुन्हेगारीकडे वळत आहेत, ही धोक्याची घंटा सरकारच्या कानावर गेली तरी पुरे असे सामनात म्हटले आहे.

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी रविवारी जनतेला संबोधताना या सर्वच मुद्दय़ांना स्पर्श केला. मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. नवरात्र, दिवाळीसारखे सण-उत्सव जवळ येत असताना एक एक पाऊल जपूनच टाकावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले तेही खरेच आहे. शेवटी पालक म्हणून जनतेची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. लोकांनी आणि प्रशासकीय यंत्रणांनीही योग्य खबरदारी घ्यायला हवी. असेही सामनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER