
कोल्हापूर :- एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा, अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटनेचा विभागीय मेळाव्यात करण्यात आले. जिल्हा काँगेस कमिटी येथे शुक्रवारी हा मेळावा झाला. विलीकरण न झाल्यास येत्या काळात तिव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी यावेळी दिला. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्यास सुरूवात झाली.
महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. रोज २२ कोटीचे उत्पन्न दहा कोटीवर आले. प्रवासी संख्या ६५ लाख वरुन २० लाखावर आली आहे. कोरोनामुळे तोट्यात वाढच होत आहे. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे अशी संघटतेची मागणी असल्याचे श्रीरंग बरगे यांनी यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी संघटनेच्या कामकाजाचा आढावा विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी घेतला.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संजय पवार वाईकर, दिपा पाटील, बबनराव थोरात, ए.आर. पाटील, परवीन पठाण, आदीसह संघटनेचे पदाधिकरी आणि एस. टी.चे कर्मचारी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला