गोळाफेकीत रायन क्रौझरचा विश्वविक्रम

Ryan Crouser

ऑलिम्पिक विजेता अमेरिकन गोळाफेकपटू (Shot Put) रायन क्रौझर (Ryan Crouser) याने गोळाफेकीत नवा इनडोअर विश्वविक्रम (Indoor world record) नोंदवला आहे. त्याने २२.८२ मीटर अंतरावर गोळा फेकला आणि आपल्याच देशाच्या रँडी बार्नसचा (Randy Barnes) ३२ वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला. बार्नसने १९८९ मध्ये २२.६६ मीटर अंतराची फेक केली होती.

रायन क्रौझर हा रियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता आहे. त्याने अर्कान्सासमधील अमेरिकन ट्रॕक लिग सिरीजमध्येही कामगिरी केली. २८ वर्षीय क्रौझरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ही विक्रमी कामगिरी केली. तिसऱ्या प्रयत्नातही २२.७० मीटर अंतरावर गोळाफेक करून त्याने बार्नसच्या विश्वविक्रमापेक्षा सरस कामगिरी केली.

२०२१ साठी ही चांगली सुरुवात आहे, असे क्रौझरने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER