ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रशियन टेनिसपटूंचे सर्वात मोठे यश

Russians advance in Australian Open

यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) रशियासाठी (Russia) अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी स्पर्धा ठरत आहे कारण टेनिसमध्ये खुले युग सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच तीन रशियन खेळाडू एकाच ग्रँड स्लॅम (Grand Slam) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत.

दानिल मेद्वेदेव (Daniil Medvedev) , आंद्रे रुबलेव्ह (Andrey Rublev) व पात्रता स्पर्धेतुन आलेला असलान कारात्सेव्ह (Aslan Kartasev) यांनी हा इतिहास घडवला आहे. दुर्देवाने या तीन पैकी कोणतेही दोनच पुढे जाऊ शकणार आहेत कारण उपांत्यपूर्व फेरीत नेमकी मेद्वेदेव विरुध्द रुबलेव्ह अशी लढत होणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकच पुढे जाऊ शकणार आहे.

चौथ्या फेरीच्या सामन्यात दानिल मेद्वेदेवने अमेरिकन मॕकेन्झी मॕकडोनाल्डवर 6-4, 6-2, 6-3 असा विजय मिळवला तर कोरोनाच्या खंडानंतर खेळल्या गेलेल्या प्रत्येक ग्रँडस्लॕम स्पर्धेच्या अंतिम आठात पोहोचलेल्या आंद्रे रुबलेव्हविरुध्दचा सामना कॕस्पर रुड याने 6-2, 7-6 असा दोन सेटने पिछाडीवर पडल्यावर सोडून दिला.

असलान कार्तासेव्ह याने पात्रता फेरीपासून अंतिम आठात धडक देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने चौथ्या फेरीत फेलिक्स औगर अॕलेसाईमवर 3-6, 1-6 असा पिछाडीवर पडल्यानंतरही 6-3, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. त्याचा सामना आता बल्गारियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER