स्वत:च्या मुलाची हत्या करणारा रशियन झार! एका क्रूर इतिहासातील गोष्ट!

Maharashtra Today

इवाच चौथा वॅसिल्युविचला ‘द टेरेबेल’ (The Terrible) म्हणजेच भयानक इव्हान या नावानं ओळखलं जातं. १५३३ ते १५४७ पर्यंत तो मॉस्कोच्या गँड प्रिंसमध्ये राहिला. यानंतर त्याच्या मृत्यू पर्यंत तो सपुर्ण रशियाच्या साम्राज्याचा पहिला झार बनला. रशियात सम्राटाला ‘झार'(Jhar) म्हणून ओळखलं जातं. चौथ्या इव्हानच्या शासन काळात रशियाचा साम्राज्य विस्तार झाला. त्यात काजान, आस्त्राखान आणि मध्य सायबेरियामधली सिबिर जिंकून रशियात सामावेश करण्यात आला होता. अशाप्रकारे जगातल्या सर्वात मोठ्या सम्राज्यांपैकी एक असलेलं ‘द ग्रेट रशियनल एम्पायर’ म्हणजेच रशियाचं महाकाय साम्राज्य उभा राहिलं.

ऐतहासिक तथ्यांवरुन (Historical facts) समजतं की इव्हान बुद्धीमान, मुत्तसद्दी, कलेला आणि व्यापाराला प्रोत्साहन देणारा शासक होता. असं असलं तरी इतिहासानं (History) त्याच्या तापट स्वभावाची आणि क्रोर्याची नोंद अधिक ठळकपणे घेतलेली आहे. त्याच्या याच रागीट स्वभावानं त्याच्या मुलाजा जीव घेतला होता (Russian Tsar who killed his own child).

कुटुंबाकडून कधीच मिळालं नाही प्रेम

इव्हानचे वडील वासिली तिसरा आणि त्याची दुसरी पत्नी एलीना ग्लिंसकाया यांचा पहिला मुलगा होता. इव्हानचा जन्म २५ ऑगस्ट १५३० साली मॉस्कोच्या गँड डची कोलोमेंसकोएमध्ये झाला. जेव्हा इव्हान तीन वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. असं मानलं जातं की त्याच्या वडीलांना कुणीतरी विष दिलं होतं. इव्हानला आधीच त्याच्या वडीलांनी ‘ग्रँड प्रिन्स’ घोषित केलं होतं. राज्य लहान होतं आणि इव्हानसुद्धा त्याची आईच सर्व निर्णय घेऊ लागली.

नंतर जेव्हा इव्हान ८ वर्षांचा झाला तेव्हा त्यांच्या आईवरही विष प्रयोग करण्यात आला तिची हत्या करण्यात आली. राजघराण्यात जन्मलेल्या इव्हानला कधीच कुटुबांच प्रेम मिळालं नाही. जेव्हा त्यांच्या आई आणि वडीलांना विष देऊन मारलं तेव्हा त्यांचे इतर नातेवाईक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त होते. १३ वर्षाचा असताना त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. परंतू तो त्यातून वाचला. अशातच त्याने विरोधकांची हत्या केली. त्याला मारण्यासाठी वारंवार कटकारस्थान केली जात. इवानचं संपुर्ण बालपण यातून मार्ग काढण्यात निघून गेलं. अशात इवान दिवसेंदिवस क्रुर आणि खतरनाक बनत चालला होता. त्या विरुद्ध होणाऱ्या कटकारस्थानांमुळं त्याचा स्वभाव दिवसेंदिवस रागीट बनत चालला होता.

त्याच्या दिवसातला अधिकतर वेळ जनावरांना यातना देऊन मारण्यात जात होता. त्याला दारुचं ही व्यसन होतं. बलात्कार आणि हत्या हा त्याचा छंद बनला होता.

१६ व्या वर्षी बनला झार

१५ जानेवारी १५४७ ला इव्हानच्या डोक्यावर राजमुकुट ठेवण्यात आला. इव्हान रशियाचा पहिला झार बनला. यानंतर त्यानं स्वतःला झार घोषित केलं. जार बनल्याच्या दोन आठवड्यानंतर त्यानं अस्तानिया रोमनोवना हिच्याशी लग्न केलं. जी रोमनोवच्या शाही परिवाराची सदस्या होती. जेव्हा इव्हानच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यात आला तेव्हा संपूर्ण जगासाठी हा संदेश होता की रशिया जगातलं सर्वात शक्तीशाली साम्राज्य बनलं आहे. इव्हान सर्वोच्च शासक असून त्याच्यावर कोणतंच प्रश्न चिन्ह उपस्थीत करु नये असा त्याचा विचार होता.

इलिजाबेथला लग्नाचा प्रस्ताव पाठवला

झार चा खिताब मिळवल्यानंतर त्याचा असा समाज होता की बायबलच्या जुन्या करारात राजाला ‘झार’ म्हणजे स्वर्गीय नेता मानलं जायचं. इव्हान स्वतःला दिव्य नेता मानत होता. जारची पदवी रशियाआणि इतर युरोपीय राजासांठी महत्त्वपुर्ण बनली होती. झारच्या सम्राज्याला क्वीन इलाजाबेथने मान्यता दिली होती. इंग्लंडशी त्यांचे व्यापार संबंध जुळले होते. दोन्ही साम्राज्यात पत्राचार होत असे. इव्हाननं इलिजाबेथचा हात मागितला होता परंतू इलाजाबेथने त्याचा प्रस्ताव नाकारला

४५०० हजार निष्पाप लोकांची हत्या

त्याच्या शासन काळात इव्हाननं प्रगितीशील कारभाराचा पाया उभारला. वर्ष १५४९ ते १५६० याकाळात त्यानं चांगल्यापद्धतीने व्यापाराला प्रोत्साहन दिलं. त्यावेळी ‘राजा’ यानावानं सराकर काम पहायचं त्यात साम्राज्यातले प्रतिष्ठीत नागरिक, दरबारी आणि सरंजामदार असत, नंतर याची संपूर्ण सुत्र हातात घेत इव्हानं प्रतिनिधी सरकार बरखास्त केलं. याचा प्रचंड विरोध झाला आणि तो विरोध नेहमीच्याच शैलित इव्हानं संपवला. या विरोधाची किंमत ४५०० जणांना जीव देऊन चुकवावी लागली.

शेवटी रशिया बरबाद झालं

इव्हानला ८ पत्नी होत्या आणि ८ मुलं होती. ज्यापैकी अनेकांचा मृत्यू लहानपणात झाला. त्यातल्या एका मुलाची हत्या त्यानं केल्याचं बोललं जातं. इव्हानच्या पत्नीच्या पोटात असलेलं बाळ इव्हानं सुनेला केलेल्या मारहाणीत मरण पावलं. याचा जाब विचारायला आलेल्या इव्हानच्या मुलाचा त्यानं १४ किलोची लोखंडी वीट डोक्यात घालून हत्या केली होती.

इव्हाननं साम्राज्य विस्ताराचं ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अनेक लढाया लढल्या. मंगोलांचा पराभव केला. वोल्गा ते युर्लस जिंकून सायबेरियापर्यंत साम्राज्याचा विस्तार केला. दुसरीकडं स्वीडक आणि पोलिश- लिथुआनियन राष्ट्र मंडळाविरोधात लिवोनीयन युद्धाचा सामना करावा लागला. अनेक दशकं क्रिमियाचा तातर मध्य रशियावर हल्ला करत राहिला. १५७१ मध्ये मॉस्कोरवर सर्वात मोठा हल्ला झाला. सगळीकडे जाळपोळ झाली. शहरं नष्ट होण्याच्या मार्गावर होती. यातच क्रिमेलिया वाचलं बाकी रशिया बर्बाद झालं होतं. आर्थिक घडी विस्कटली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button