बौद्ध भिक्खूंकडून रशियन वैज्ञानिक घेत आहेत समाधीचे धडे!

Samadhi lessons from Buddhist monks - Maharashtra Today

मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे; त्याच वेळी रशियाही मंगळावर मानव पाठविण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीत रशियन अंतराळ वैज्ञानिक आजकाल तिबेटी बौद्ध भिक्खूंकडून समाधीचे धडे घेत आहेत! बौद्ध भिक्खू कित्येक आठवडे अन्नपाणी न घेता समाधी अवस्थेत राहतात आणि समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्यांचे नियमित जीवन सुरू होते.

मास्को स्टेट युनिव्हर्सिटीने १०० बौद्ध भिक्खूंना समाधीचे धडे देण्यासाठी निवडले आहे. दीर्घ अंतराचे स्पेस मिशन आणि मंगळ ५०० अभियानचे नेतृत्व करणारे प्रो. युरी बबयेव या संदर्भात म्हणाले, बौद्ध भिक्खू शीतनिद्रा घेतात. ही स्थिती मंगळ मिशनसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. समाधी अवस्था यावरही अध्ययन सुरू आहे. डॉक्टरने एखाद्या साधकाला मृत घोषित केले असले तरी अनेक आठवडे या अवस्थेतील भिक्कू ताठ बसू शकतात.

प्रेताला येणारी दुर्गंधी त्यांच्या शरीराला येत नाही अथवा मृत झाल्याची अन्य लक्षणे त्यांच्यात दिसत नाहीत. याला गहन एकाग्र अवस्था म्हणता येते. गहन एकाग्रता अवस्थेत चयापचय गतीमध्ये बदल होतो. अनेक तास, दिवस या अवस्थेत राहण्यासाठी ध्यान, एकांत आणि मंत्रोच्चार यांचा अभ्यास करावा लागतो. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या परवानगीनेच हे अध्ययन केले जात असल्याचे बबयेव यांनी स्पष्ट केले. ही अवस्था गाठता आली तर शरीराला जास्त नुकसान न होता अंतराळ प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास हे वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button