रशिया : विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेविरुद्ध लाखो निदर्शक रस्त्यावर

Russia Protest

मॉस्को (रशिया) – विरोधी पक्षनेते एलेक्सी नवेलनी यांच्या अटकेनंतर रशियामध्ये राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात लाखो लोक राजधानी मॉस्कोच्या रस्त्यांवर उतरले आहेत. मास्कोशिवाय रशियातील सुमारे १०० शहरांमध्ये रस्त्यांवर निर्दशने सुरु आहेत.

मॉस्कोमध्ये पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला. त्यांना फरपटत पोलीस वाहनांमध्ये कोंबले. ३ हजारांपेक्षा जास्त निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. मॉस्कोपासून दूर सायबेरिया, सेंट पीटर्सबर्ग येथेही लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आंदोलकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी ते वरिष्ठ नागरिक सहभागी झाले आहेत. नवेलनी यांच्या पत्नी युलिया यांनीदेखील आंदोलनात भाग घेतला होता. त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नवेलनी यांना मॉस्कोमध्ये १७ जानेवारीला अटक करण्यात आली आहे. नवेलनी हे पुतिन यांचे कट्टर विरोधक आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये नवेलनी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विमान प्रवासात त्यांना विषमिश्रित पेय देण्यात आले होते. यानंतर त्यांची अवस्था गंभीर झाली होती. यातून बरे झाल्यानंतर नवेलनी यांनी जर्मनीत आश्रय घेतला होता. विश्रांती घेतल्यानंतर बर्लिन येथून नवेलनी १७ जानेवारीला मॉस्कोला परतले. त्यांना विमानतळावरच अटक करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER