रशियाने तयार केली कोरोनावरील लस, मुलीला दिला डोस – पुतीन

President Vladimir Putin - Coronavirus Vaccine

रशियाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांनी केला आहे.

पुतिन यांच्या मुलीला त्याचा डोस देण्यात आला असून या लसीचे लवकरच मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल असे वृत्त रशिया(Russia) टुडेने दिले आहे.

रशियामध्ये ही लस घेणे ऐच्छिक ठेवण्यात आली आहे, असे पुतिन यांनी सांगितले. सुरुवातीला ही लस आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे, ती जानेवारीपासून ही लस सर्वांसाठी उपलब्ध असेल.

“ही लस(Coronavirus Vaccine) प्रभावीपणे काम करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. या लसीने सर्व महत्त्वाच्या चाचण्या पार केल्या आहेत,” असं पुतिन म्हणालेत.

रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात – गामालेया इन्स्टिट्यूट इथं कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरू होतं. जुलै महिन्यात माणसांवर या लशीची चाचणी घेण्यात आली. ऑगस्टमध्ये लशीची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात येईल, असं त्यांच्यातर्फे सांगण्यात आले होते.

लस शोधण्याचं काम नियंत्रित करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER