पुणे अनलॉक करण्यास घाई केली : अजित पवार

Pune Unlock-Ajit Pawar

मुंबई :राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात टाळेबंदी (Lockdown) उठवण्याबाबत मुख्यमंत्री उत्सुक नव्हते. मात्र, व्यापारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना अशा विविध घटकांकडून टाळेबंदी उठवण्याची मागणी होत होती. त्यामुळे टाळेबंदी उठवण्यात घाई झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. पुणे (Pune) शहर हे देशातील कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे .

दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत नागरिक मास्क वापरताना दिसत नाही.

फिजिकल डिस्टन्स पाळताना दिसत नाही. तर काहींना वाटते की, मास्कची गरज नाही, असे निरीक्षण नोंदवताना प्रत्येकाने मास्कचा वापर करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.

तसेच मास्क न घालणाऱ्या आणि कुठेही थुंकणार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, पुणे शहरात शनिवारी दिवसभरात नव्याने १७३६ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ३ हजार ८१२ इतकी झाली आहे.

ही बातमी पण वाचा : … म्हणून ‘अजितदादां’नी बारामतीतील १४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ आणला ७ दिवसांवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER