शरद पवारांच्या वाढदिवसाचा केक खाण्यासाठी झुंबड ; निलेश राणेंनी ट्विट करत साधला निशाणा

Nilesh Rane - Sharad Pawar - Dhananjay Munde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं  आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळी मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता गोविंदा (Govinda) यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाचे नियम पायदळी तुडवत केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे यांनी हाच धागा पकडत निशाणा साधला. पवारांच्या वाढदिवसासाठी ८१ किलोंचा केकही आणण्यात आला होता. धनजंय मुंडे आणि गोविंदा यांनी केक कापून कार्यक्रम संपवला. मात्र, त्यानंतर स्टेजवर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

भाजपा (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी याचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत मुंडेंवर निशाणा साधला आहे . मन खचून गेलं हे पाहून… महाराष्ट्रात ६० वर्षांमध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहींना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोक म्हणतात, त्या ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते, असा टोला निलेश राणेंनी ट्विट करत लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER