ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ झाले क्वारेंटाइन

Hasan Mushrif - Home Quarantine

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुस्लिम पाणी या कार्यकर्त्याचा रोजचा संपर्क येत होता त्यामुळे सावधगिरी म्हणून मुश्रीफ होम क्वारेंटाइन(Home Quarantine) झाले आहेत. मुश्रीफ यांनी पुढील काही दिवसातील सर्व जाहीर कार्यक्रम रद्द केले आहेत.

याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून दिलेली माहिती अशी, यांचे येत्या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द.आठवडाभर मंत्री मुश्रीफ कोणालाही भेटणार नाहीत त्यांचे शुक्रवार (ता. १७) ते सोमवार (ता.२०) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौरे रद्द करण्यात येत आहेत. ते नित्यनियमाने सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत जनतेला भेटत असतात, जाहीर कार्यक्रमांमधून व्यस्त असतात. परंतु; मंत्री मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. तसेच या आठवड्यात कुणालाही भेटणार नाहीत.

या पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप, गडहिंग्लज व उत्तूर येथे भेटी, शासकीय बैठका, वैयक्तिक गाठीभेटी असे सर्वच कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत.

दरम्यान, आत्ता बदल्यांचा काळ सुरू आहे. ज्यांना बदल्यांची पत्रे द्यावयाची असतील, तसेच महत्त्वाची कामे असतील त्यांनी कागलमध्ये नामदार मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्यालय तसेच कोल्हापूरमध्ये कावळा नाका शासकीय विश्रामगृह येथील ऑफीसचे कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे द्यावीत. पुढच्या आठवड्यात मुश्रीफ मुंबईला गेल्यानंतर त्या -त्या संबंधित सन्माननीय मंत्रीमहोदयाकडे ही पत्रे देऊन, त्याची पोहोच दिली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER